१५ ते २० नोव्हेंबरदरम्यान विधानसभेसाठी मतदान. – शरद पवार

24 प्राईम न्यूज 30 Sep 2024.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडेल, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी वर्तविले.
शरद पवार म्हणाले की, निवडणकू आयोगाची टीम राज्यात आली होती. त्यांनी अनेक पक्षांच्या प्रमुखांसोबत चर्चा केली. त्यानंतर मी काही राजकीय नेत्यांसोबत बोललो. त्यातून असे दिसते की ६ ते १० ऑक्टोबरदरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आणि त्या दिवसांपासून आचारसंहिता लागू होईल. १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाविकास आघाडी उमेदवारांची घोषणा करेल, असेही पवार म्हणाले. नुकत्याच महाराष्ट्र द्रौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकानेही राज्यात विधानसभेच्या निवडणुका या मुदत संपण्याआधीच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.