अमळनेर येथे राष्ट्रीय लोक अदालतीत १०७ खटले निकाली.

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीत १०७ खटले निकाली निघाले. यात सुमारे १ कोटी ८८ लाख ७८ हजार ७९३ रुपये वसूल करण्यात आले आहेत. एकूण चार पॅनल समोर ७४ प्रलंबित तर ३३ वादपूर्व खटल्याचा निकाल लागला. न्यायाधीश सी. व्ही. पाटील, अॅड. जे. यू बडगुजर, अॅड. जे. यू, बडगुजर, न्यायाधीश पी. पी. देशपांडे, पंच डी. डी. महाजन, न्यायाधीश एस. एस. जोंधळे, पंच अॅड. चेतना पाटील, न्यायाधीश ए. यू यादव, पंच अॅड.आर. पी. देशपांडे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. यज्ञेश्वर पाटील, उपाध्यक्ष नंदलाल सूर्यवंशी, सचिव जितेंद्र साळी, अॅड. व्ही डब्ल्यू वाणी, जी. वाय. विंचूरकर, के. व्ही. कुलकर्णी, अॅड. किशोर बागूल यांनी परिश्रम घेतले.
ن