एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भुसावळ सुरत पॅसेंजरने गुजरात रवानगी. -अमळनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अनोखे आंदोलन.

आबिद शेख/अमळनेर
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रतीकात्मक मुखवटे घालून केली गुजरात रवानगी. अमळनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अनोखे आंदोलन.
युवकांच्या पोटावर पाय देत सर्व प्रकल्प गुजरातच्या घशात ओतनाऱ्या आणि रोजगाराचा बळी घेणाऱ्या बोगस ट्रिपल इंजिन सरकारला कायमचे गुजरातला पाठवा – युवक अध्यक्ष परेश शिंदे
सध्या निवडणुकीची धामधूम पाहता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचे पहायला मिळत आहे. सध्या युवक व त्यांचा रोजगार हा मुद्दा ऐरणीचा असला तरी महाराष्ट्राच्या हातातून अनेक उद्योग प्रकल्प निसटून गुजरातला पळवून नेण्याचा प्रकार मोदी सरकार करत असताना शिंदे फडणवीस आणि अजित पवार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने संतापाची लाट निर्माण झाल्याचे राष्ट्रवादीच्या गोटात बोलले जात आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा, वेदांता, फॉस्कोर्न, टाटा एअर बस आणि आता चाकण मधील ५० कंपन्यांनी गुजरात ला जाण्याचा निर्णय घेतला असताना खोके सरकार गप्पा का? दावोस ला जाऊन महाराष्ट्रात मोठी इन्व्हेस्टमेंट आणतो म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तेथील होटेल चे बिल अजून चुकते केलेले नाही यामुळे महाराष्ट्राची नाचक्की होत आहे याला जबाबदार कोण असा सवाल राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील यांनी यावेळी केला.
आज सरकारचे गुजरात वरील प्रेम पाहता या तिघांनी बॅग भरून गुजरातला राहायला जावे . त्यासाठी त्यांची बॅग भरून तयार आहे तसेच त्यांच्या तिकिटांची देखील व्यवस्था आम्ही केली आहे असे शहर अध्यक्ष श्याम पाटील आंदोलन वेळी सांगितले.
आंदोलनाचे आयोजक युवक तालुका अध्यक्ष परेश शिंदे यांनी या सरकार विषयी निषेध व्यक्त करतांना आमच्या युवकांचे हक्काचे प्रकल्प गुजरातच्या घशात घालू पाहणाऱ्या सरकारने महाराष्ट्रात मते मागू नये त्यासाठी देखील त्यांनी गुजरातलाच जावे असे ठणकावून सांगितले.
सदर आंदोलन वेळी महिला तालुका अध्यक्ष कमल आक्का पाटील, ग्रंथालय नियोजन समिती सदस्य रिता बाविस्कर, युवक उपजिल्हाअध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे, विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस वेदांशू पाटील, अक्षय चव्हाण, शुभम पवार, आरती पाटील, रोशनी पाटील, योगेश शिसोदे, दिपक पाटील, वैभव पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.