जानवे शिरूड गट यंदा भाजप महायुतीलाच खंबीर साथ देणार.                                       -विकासाभिमुख नेतृत्व अनिल पाटलांच्या विजयासाठी आम्ही झालो एकसंघ,भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा..

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर -विधानसभा मतदारसंघात सुमारे 41 गावांचे मोठे साम्राज्य असलेला आमचा जानवे शिरूड जि. प. गट यंदा भाजप महायुतीलाच खंबीर साथ देणार असून आमचे महायुतीचे उमेदवार अनिल पाटील हे विकासाभिमुख नेतृत्व असल्याने त्यांच्या विजयासाठी खासदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारे पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंघ झालो असल्याचा दावा या गटातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या गटातून अतिशय मोठा लीड अनिल पाटलांना मिळेल असेही पं स चे माजी सभापती श्याम अहिरे, रेखाबाई नाटेश्वर पाटील, माजी उपसभापती बाळासाहेब जीवन पाटील, माजी जि प सदस्य संदीप पाटील, भाजप पदाधिकारी श्रीनिवास मोरे, राकेश पाटील युवा मोर्चा, जितुबापू फाफोरेकर आणि सरचिटणीस जिजाबराव पाटील यांनी सांगितले. स्वर्गीय उदय बापू वाघ आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मोठा सागर या गटात निर्माण केला असल्याने कार्यकर्त्यांची मोठी फौज अनिल पाटलांच्या विजयासाठी कामाला लागली असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच या गटाच्या विकासासाठी आणि समृध्दीसाठी भूमिपुत्र अनिल दादा पाटील मोठे योगदान गेल्या पाच वर्षात दिले आहे.प्रामुख्याने त्यांच्याच माध्यमातून पावसाळ्यात बोरी नदीचे पाणी वाहून जात असल्याने ते अडविण्यासाठी चार सिमेंट बंधारे टाकले गेल्याने,शेतकरी राजाच्या शेतीसाठी पाण्याची सोय झाली, गाव तेथे विकास काम,गाव तेथे रस्ते,गाव तेथे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना,गाव तेथे शेतरस्ते,गावोगावी प्रबेशद्वार,सामाजिक सभागृह, स्मशानभूमी नूतनीकरण, सांत्वन शेड,बस स्थानक शेड,सभा मंडप, शाळा व चौक सुशोभीकरण,मोरी बांधकाम, गाव दरवाजा आदी कामे आतापर्यंत सर्वच गावात झाल्याने गटाचा विकासाचा आलेख नक्कीच उंचावला आहे,या विकास पर्वमुळे निश्चितच प्रत्येक गावाचे रूप पालटल असून नवीन पाणीपुरवठा योजना गावांसाठी नवसंजीवनी ठरल्या आहेत.या गटात असं एक गाव नाही जेथे मंत्रीमहोदय अनिल दादांच काम नाही. आतापर्यंत जास्तीत जास्त निधी या गटाला देण्याचा प्रयत्न अनिल दादांनी केला आहे.
अनिल दादांनी बोरी नदीवर मृदू व जलसंधारण अंतर्गत फाफोरे येथे 2,बहादरवाडी येथे 1,अमळनेर हद्दीत 1 सिमेंट बंधारे टाकले असल्याने वाहून जाणारे पाणी अडवले जाऊन खऱ्या अर्थाने कृषी संजीवनीचा मार्ग खुला झाला,शिरूड येथेही सिमेंट बंधारा झाल्याने या बंधाऱ्यामुळे एक नवीन अध्याय भूमिपुत्र अनिल दादांच्या नावे लिहिला गेला,याशिवाय आतापर्यंत प्रत्येक गावात निधीची बरसातच या भूमीपुत्राने केली असल्याने गावाचा चेहरामोहरा बदलला आहे.जानवे येथे 1 कोटी 60 लक्ष,ढेकू बु.व खुर्द येथे 1 कोटी 5 लक्ष,मंगरूळ येथे 1 कोटी,पिंपळ्यात 50 लक्ष,ढेकू सिम 50 लक्ष,फाफोरे येथे 1 कोटी,सारबेटा 65 लक्ष, शिरूड 1 कोटी,कन्हेरे 55 लक्ष या व्यतिरिक्त प्रत्येक लहान मोठ्या गावात अशीच आकडेवारी असल्याने शाश्वत विकास झाला आहे.
यामुळे विकासाचा अजेंडा घेऊन चालणाऱ्या अनिल दादा पाटील यांना आमचा संपुर्ण गटातील प्रत्येक गावातून भरभरून मतदान होईल असा विश्वास सर्व भाजप पदाधिकारिनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!