सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द पाळणारा अवलिया मुख्याधिकारी…

अमळनेर (प्रतिनिधि) सुमारे चार ते पाच वर्षापासून सेवानिवृत्त सफाई कामगारांचे ग्रॅज्युटी, उपदान, इत्यादी रकमा प्रलंबित होत्या त्यासाठी कर्मचारी संघटनांनी 26 जानेवारी रोजी आमरण उपोषणाची नोटीस देऊन उपोषणास बसण्याची तयारी चालवली होती परंतु कर्मचारी प्रिय व कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे यांनी सफाई कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले होते की मी तुम्हाला निश्चितच काही ना काही देईल असे म्हणून आज दिनांक 2/ 2/ 2023 रोजी सेवानिवृत्त 46 कर्मचाऱ्यांना सुमारे 76 लाख 47 हजार 167 रुपयाचे धनादेश देऊन बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रकमा देऊन खूप मोठे कार्य केलेले आजपर्यंत कोणत्याही मुख्याधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या रकमा दिलेल्या नव्हत्या त्या श्री सरोदे साहेबांनी एकरकमी वाटप केले असून या बाबत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे
मुख्याधिकारी साहेबांनी दिलेला शब्द पाळल्याने राष्ट्रीय नगरपालिका मजदूर महासंघाचे सरचिटणीस अविनाश संदानशिव, अध्यक्ष श्री शकील काझी, भारतीय कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सोमचंद संदानशिव, अध्यक्ष प्रसाद शर्मा यांनी आभार मानले आहे