नॅशनल हायस्कूलमध्ये आनंद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…

24 प्राईम न्यूज 30 Jan 2025. आज नॅशनल हायस्कूलमध्ये आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष श्री. गुलाम दस्तगीर यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे सदस्य श्री. सय्यद हुस्नोद्दीन, श्री. कलीम शेख, तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून विक्रीसाठी आणले. त्यांनी व्यवसायाची मूलतत्त्वे, नफा-तोटा याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना निर्माण झाली आणि त्यांनी उत्साहात सहभाग घेतला.