पातोंडा येथे विजय मोरे यांचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने लंपास केला.

आबिद शेख/अमळनेर
पातोंडा गावात दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने विजय मोरे यांना फोन लावण्याच्या बहाण्याने गाठून त्यांचा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, विजय मोरे आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्याकडे येऊन फोन लावायचा असल्याचे सांगितले. विश्वास ठेवून त्यांनी मोबाईल दिला, मात्र तो इसम मोबाईल घेऊन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शोधाशोध केली, मात्र तोपर्यंत चोरट्याने फरार होण्यास यश मिळवले सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.