विजय शॉपी जवळ लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया. -नागरिकांनी तातडीने उपाययोजनांची मागणी केली

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर विजय शॉपीजवळ पाण्याच्या पाईप मधुन लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, पाणी गळतीमुळे रस्त्यावर वाहत असून प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
रस्त्यावर वाहणारे पाणी फक्त वाया जात नाही तर त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका देखील निर्माण झाला आहे. पाण्याच्या टंचाईने त्रस्त असलेल्या अनेक भागांमध्ये पुरेशी पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध नाही, अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे परिणाम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांनी तातडीने संबंधित विभागाला कळवले असले तरी अद्याप कोणतीही दुरुस्तीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी आणि पाण्याच्या नासाडीला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.