अमृतसर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना – अमळनेरात तीव्र संताप..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर, दि. 27 जानेवारी – अमृतसर येथे एका माथेफिरूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करत पुतळ्याचे नुकसान केल्याची घटना घडली. या घटनेचा तीव्र निषेध अमळनेर शहरातील विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी व्यक्त केला. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, माथेफिरूवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर सामाजिक परिषदेचे नरेंद्र संदानशिव, नगरपरिषद नाशिक विभागाचे अध्यक्ष सोमचंद संदानशिव, आरपीआय आठवले गटाचे यशवंत बैसाणे, ऍड. अभिजित बिऱ्हाडे, महाराष्ट्र सफाईगार संघटनेचे अध्यक्ष अनिल बेंडवाल, मागासवर्गीय प्राध्यापक संघटना जिल्हा सचिव डॉ. राहुल निकम, प्रा. डॉ. विजय खैरनार, प्रज्ञाशील सैंदाणे, जानवेचे पितांबर वाघ, मंगरूळचे अरुण घोलप, बौद्धाचार्य बापूराव संदानशिव, दिनेश बिऱ्हाडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, तसेच विनोद बिऱ्हाडे, चंद्रकांत संदानशिव, भरत सोनवणे, अरविंद संदानशिव, राजेंद्र संदानशिव, किरण संदानशिव, दीपक सोनवणे, संजय संदानशिव, अर्जुन गढरे, संजय बिऱ्हाडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या सह्या आहेत.
अमृतसरमधील या घटनेमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपार आदर असलेल्या समाजाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. आरोपीविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.