चाळीसगाव येथील तहज़ीब उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये बाल आनंद मेळावा संपन्न..

आबिद शेख/अमळनेर
– तहज़ीब उर्दू प्रायमरी स्कूल, चाळीसगाव येथे आज बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला कादरिया एज्युकेशनल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी, चाळीसगावचे अध्यक्ष आणि सदस्य तसेच विशेष मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जनाब गुलाम दस्तगीर सर, हुसनोद्दीन सर, जनाब सय्यद अशफाक सर, रुबिना मॅडम आणि मार्गदर्शक म्हणून इतर मान्यवर उपस्थित होते. या आनंद मेळाव्यात तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रम अतिशय यशस्वी पार पडला आणि विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.