मोबाईल व्यापाऱ्यांच्या अडचणी आणि त्यावरील उपायांवर चर्चा; बैठक २ फेब्रुवारीला आयोजित.

आबिद शेख/ अमळनेर. अमळनेर येथील मोबाइल विक्री-दुरुस्ती व्यापारी असोसिएशनची महत्वाची बैठक रविवार, २ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता भागवत रोडवरील भांडारकर कंपाऊंड, शिवसेना कार्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत मोबाइल व्यापार क्षेत्रातील अडचणी, स्थिरता आणि उपाययोजना यावर विचारमंथन होणार आहे. व्यापाऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी असोसिएशनचे अमित ललवाणी, प्रविण महाजन आणि अन्य पदाधिकारी व्यापाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेत आहेत.
मोबाइल व्यवसायात काम करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन मोबाइल व्यापारी असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.