बजेट 2025-26: मध्यमवर्गीयांसाठी करसवलतींची मोठी भेट, शेतकरी आणि महिलांसाठी विशेष योजना – खासदार सौ. स्मिता उदय वाघ..

आबिद शेख/अमळनेर. – जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ. स्मिता उदय वाघ यांनी केंद्र सरकारच्या बजेट 2025-26 चे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांनी हे बजेट मध्यमवर्ग, शेतकरी, महिला आणि युवकांसाठी प्रगतिशील असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे हे बजेट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा – करसवलतीत ऐतिहासिक निर्णय
- ₹12 लाख पर्यंतचे उत्पन्न करमुक्त.
- वेतनभोगी कर्मचाऱ्यांसाठी ₹12.75 लाख पर्यंत कर नाही.
- ₹16 लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीस ₹50,000 करसवलत, ₹20 लाख उत्पन्नावर ₹90,000 सवलत.
- नवीन कर श्रेणी:
- ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलत:
- व्याजावर करमुक्ती ₹50,000 वरून ₹1 लाखपर्यंत वाढवली.
- भाड्यावरील टीडीएस मर्यादा ₹2.4 लाख वरून ₹6 लाखपर्यंत वाढवली.
शेती आणि ग्रामीण विकासासाठी मोठी गुंतवणूक
- प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना – 100 जिल्ह्यांत लागू, 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ.
- डाळींच्या उत्पादनासाठी विशेष योजना – तुर, उडीद आणि मसूरसाठी धोरणात्मक मदत.
- किसान क्रेडिट कार्ड (KCC) मर्यादा ₹3 लाख वरून ₹5 लाखपर्यंत वाढवली.
- ग्राम समृद्धी आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना – 100 कृषी जिल्ह्यांत नवे रोजगारनिर्मिती उपक्रम.
महिला आणि युवकांसाठी नवी संधी
- SC/ST आणि महिलांसाठी स्टार्टअप्सना ₹2 कोटीपर्यंत कर्ज.
- महिला उद्योजकांसाठी स्वनिधी योजना – ₹30,000 पर्यंत क्रेडिट कार्ड.
- 50,000+ अटल टिंकरिंग लॅब्स शाळांमध्ये उभारल्या जाणार.
- नवीन IIT मध्ये 6,500+ अतिरिक्त प्रवेश क्षमतेची तरतूद.
पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाला चालना
- ₹1.5 लाख कोटींची 50-वर्षीय व्याजमुक्त कर्ज योजना.
- रेल्वे, महामार्ग आणि शहरी वाहतूक क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक.
- UDAN योजनेचा विस्तार – 120 नवीन विमानतळ गंतव्यस्थळे.
- MSME साठी क्रेडिट गॅरंटी कव्हर ₹5 कोटी वरून ₹10 कोटीपर्यंत वाढवले.
आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा
- मेडिकल कॉलेजमध्ये 10,000 नवीन जागा, पुढील 5 वर्षांत 75,000 वैद्यकीय जागा.
- 36 जीवनरक्षक औषधांना कस्टम ड्युटीमधून संपूर्ण सूट.
- कॅन्सर डे-केअर केंद्र प्रत्येक जिल्हा रुग्णालयात स्थापन.
- आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 500 कोटींचे सेंटर ऑफ एक्सलन्स.
बजेट देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे पाऊल – खासदार सौ. स्मिता उदय वाघ
खासदार सौ. स्मिता उदय वाघ यांनी बजेटचे कौतुक करताना सांगितले की, “हे बजेट मध्यमवर्गीयांना दिलासा देणारे, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे, महिलांसाठी संधी निर्माण करणारे आणि भारताच्या आत्मनिर्भरतेला बळ देणारे आहे. मोदी सरकारच्या या दूरदर्शी निर्णयामुळे देशाच्या विकासाला नवी दिशा मिळेल.”