4.5 वर्षीय दानिया जमीर खान हिने पहिला रोजा..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर येथील 4.5 वर्षीय चिमुकली दानिया जमीर खान हिने आपल्या बालवयातच पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिच्या या धाडसाचे आणि श्रद्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दानियाने अत्यंत समर्पणाने आणि संयमाने पूर्ण दिवस उपवास धरला. परिवारासह समाजातील अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे, एवढ्या लहान वयात देखील तिने रोजाच्या महत्त्वाची जाणीव ठेवून उपवास पूर्ण केला, ही बाब प्रेरणादायी ठरत आहे.
तिच्या या यशाबद्दल परिवारातील सदस्यांसह स्थानिक नागरिकांनीही तिचे विशेष कौतुक केले असून, हा क्षण तिच्यासाठी तसेच तिच्या कुटुंबीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा ठरला आहे.