नेक काम में देरी क्यु,असे म्हणत रशीद खान व रऊफ मेंबर यांनी पुढाकार घेऊन साखरपुडात लग्न लावून दिले…

0

जळगांव ( प्रतिनिधी ) शहरातील नियामतपुरा ( भिलपुरा ) येथील अब्दुल सत्तार याने साखरपुडयातच लग्न करून मुस्लिम समाजात एक अतिशय चांगला संदेश दिला  आजच्या काळात सगळीकडे लग्न समारंभ म्हटला म्हणजे बडेजाव करण्याच्या नादात हौसमौज करतांना महागड मंगल कार्यालय, महागडी वाजंत्री, धोडा, थाटमाट, जेवणावळी सोबतच मानपान, रुसवेफुगवे, आहेर देणेघेणे, कन्यादान करतांना अटीतटीची भाषा अशा अनन्यसाधारण रुढी परंपरेच्या नावाखाली होणारा लाखो रुपये अनाठायी खर्च हे आलेच, परंतु जळगांव तालुक्यातील शिरसोली गावात मात्र या जुन्या रुढी परंपरा

झुगारुन एक अनोखा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्याची शिरसोली गावासह पंचक्रोशीतील गावागावातून कौतुकास्पद चर्चा सुरु असून आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या व महागाईच्या काळात असेच विवाह सोहळे होण्याची गरज आहे असे मत सुज्ञ नागरिकांनी व समाजबांधवांनी व्यक्त केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगांव तालुक्यातील शिरसोली गावातील हातमजुरी करणारे आजाद शेख यांची कन्या मुस्कान बी आणि जळगांव शहरातील भिलपुरा येथील रहिवासी ते पण हातमजुरी करणारे कासीम खान यांचा चिरंजीव अब्दुल सत्तार खान यांच्या साखरपुडा दिनांक ०९ फरवरी २०२३ गुरुवार रोजी जळगांव जिल्ह्यातील शिरसोली गावात होता दुपारी १२ वाजता साखरपुडा पर पडला आणि मुलाचे मोठे काका रशीद खान,सलीम शेख,मुलीचे काका इस्माईल शेख व्यापारी, व शिरसोली ग्राम पंचायतीच्या माजी सदस्य रऊफ मेंबर, भाबड्या व्यापारी, यांनी चहापाणी झाल्यावर गप्पागोष्टी सुरु झाल्यावर पक्षाकडून आलेले पाहुणे काय सांगतात व काय मागतात या तणावाखाली वधूपक्ष तणावाखाली असतांनाच अचानकपणे वर पक्षाकडून साखरपड्यातच लग्न उरकवून घेण्यासाठीचा प्रस्थाव ठेवण्यात आला हा प्रस्ताव समोर येताच वधु पक्षाकडील मंडळी अचंबित झाली व सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले.
लगेचच ‘नेक काम मे देरी क्यू’ असे म्हणत वधुवरांकडच्या मंडळींनी शहरात जाऊन साखरपुडा व लग्नाच्या वस्तूंची खरेदी करुन सायंकाळी दोघांचा हळदची प्रक्रिया पूर्ण केली आणि दोघांच्या उपस्थित नातेवाईक व गावातील प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत रात्री ९ वाजता इशाची नमाजपठण करून जळगांव येथील मौलाना जबिर हुसैन यांनी निकाह ची प्रक्रिया केली आणि अतिशय थाटात विवाह सोहळा पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!