तालुका विधी सेवा समिती एरंडोल येथे राष्ट्रीय लोकअदालत संपन्न..

एरंडोल(प्रतिनिधि) येथील तालुका विधी सेवा समिती, एरंडोल येथे दि.११/०२/२०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयाेजन करण्यात आले. राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण १४४ दाखलपुर्व प्रकरणे निकाली झाली असून त्यात रक्कम रु.५९,५०,८३७/- ची तडजोड झाली. तसेच न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकुण १९ प्रकरणे निकाली झाली असून त्यात रक्कम रु.४,८९,२००/- ची तडजोड झाली. एकंदरीत एकुण १६३ प्रकरणे निकाली झालेली असून त्यात रक्कम ६४,४०,०३७/- रु.ची तडजोड झाली. सदर लोकअदालतीस एरंडोल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश श्रीमती बी.ए.तळेकर मॅडम पॅनल प्रमुख म्हणून तर पंच न्यायाधीश म्हणून विधिज्ञ श्री. ए. एम. काळे उपस्थित होते. तसेच श्री. विशाल श्रावण धोंडगे, दिवाणी न्यायाधीश एरंडोल, सहा. सरकारी अभियोक्ता डी.बी.वळवी, सहा. सरकारी अभियोक्ता श्रीमती कविता चव्हाण, अॅड. श्री. एम.ओ. काबरे, अध्यक्ष तालुका वकील संघ एरंडोल, अॅड.श्री. विलास के. मोरे, अॅड.श्री.ए.ए.काळे, अॅड.श्री.एच.बी.पाटील, इतर विधीज्ञ, सहा. अधिक्षक आर.एम. मुकुंदे व न्यायालयीन कर्मचारी, पो.काॅ. धर्मेंद्र ठाकूर, पो.कॉ.कैलास हडप. इ. उपस्थित होते.
………………………………………………..