आज चोपडा बंद. भव्य मुक जन आक्रोश मोर्चा…

संपूर्ण चोपडा शहर दुपारी 12:00 वाजेपर्यंत बंद
चोपडा (प्रतिनिधि) सकाळी दहा वाजता गोल मंदिर पासून मोर्चा सुरुवात समारोप तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन मोर्चाचा समारोप होईल माता भगिनी व बंधूंनी हजारोच्या संख्येत उपस्थित रहावे ही कळकळीची व आग्रहाची विनंती
काल मध्यरात्री मेन रोडवरील राहुल एम्पोरियम कापड दुकानाचे मालक सुरेश भाई राखेचा यांचे संपूर्ण घर दोन्ही मजले आगीत भस्मसात झाले त्यांचा तरुण मुलगा स्वं. गौरव राखेचा वय २७ याचे आगीत जळून दुःखद निधन झाले सामान्य माणसाचा मनाला वेदना करणारी व शहारे आणणारी ही दुःखद घटना झाली असा प्रकार पुन्हा होऊ नये त्यासाठी ज्या काही त्रुट्या यावेळेस निदर्शनास आल्या चोपडा नगर प्रशासनाचे अग्निशामक दल संपूर्णपणे आधुनिक नव्हते अग्निशामक दलाला जागेवर यायला उशीर झाला त्या नंतर शिरपुर, धरणगाव, अमळनेर ,जळगाव व अन्य शहरातील अग्निशामक दलांनी येऊन आग वीजविण्यास मदत केली चोपडा अग्निशमन दलाकडे अत्याधुनिक साहित्य नसल्यामुळे फायरमन दीपक बडगुजर हे सुद्धा भाजले पण तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले होते असा प्रकारची आवृत्ती भविष्यात पुन्हा होऊ नये म्हणून शहरातील जागृत नागरिकांच्या वतीने नगरपालिका प्रशासनाने सुसज्ज व्हावे म्हणून मुक आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे हा मोर्चा कोणाच्या विरोधात नसून प्रशासनाने अत्यावश्यक सेवेसाठी सक्षम होणे गरजेचे आहे नवीन अत्याधुनिक फायर फायटर ची गाडी व प्रशिक्षित फायर फायटर्स ची आवश्यकता आहे सदरचा मोर्चा हा सर्व जाती धर्म संपूर्ण नागरिकांचा मूक आक्रोश मोर्चा आहे अशी अघटीत घटना भविष्यात चोपडा शहर व तालुक्यात घडू नये म्हणून प्रशासनाने दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे
अमृतभाई सचदेव, चंद्रहासभाई गुजराथी, अनिलभाऊ वानखेडे ,एम व्हि नाना पाटिल , सुकलाल कोळी,जीवनभाई चौधरी, प्रविणभाई गुजराथी सुनिलभाई बुरड ,सागरभाऊ ओतारी, भुपेन्द्र भाई गुजराथी, आबाभाऊ देशमुख,विकास पाटिल भैय्या, भाऊ पवार ,राजुभाऊ (बिटवा) पाटिल , किशोरभाऊ चौधरी,डॉ रवींद्र पाटील ,गजेंद्रभाई जयसवाल, राजेंद्र गंगाधर पाटिल, पंकज पाटिल ,प्रदीप लिंबा पाटिल नंदुआबा पाटिल, नंदकिशोर सांगोरे ,श्याम भाऊ परदेशी, संजय श्रावगी सुनील बरडिया पुंडलिक भाऊ महाजन मुक्तार भाई सरदार राजूभाऊ देशमुख राजाराम बापू पाटील. धिरजभाई गुजराथी प्रमोद बोरसे पाटिल गोपाल भाऊ सोनवणे दिपक चौधरी प्रदिप बारी नरेंद्र पाटिल वंसत पाटिल गुलाबचंद देसरडा प्रदीपभाई बरडिया राजेंद्रभाई जैन दगडूशेठ श्रावगी नरेश भाऊ महाजन यशवंत भाऊ चौधरी