किस्सा एरंडोलचा-एक कि.मी.चा रोड-गतीरोधक मात्र 7 ठिकाणी…. अपघात होऊ नये म्हणून की नागरीक, वाहनधारकांना दे दणादण..

0

.
एरंडोल ( कुंदन सिंह ठाकुर ) एरंडोल रस्त्यांवर अपघात होऊ नयेत, नागरीकांच्या जीवाचे रक्षण व्हावे, वाहन सुरक्षित राहावे या आणि आणखी अनेक चांगल्या हेतूने रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यात येतात. यासाठी किमान सावधान… फलक तरी असतो जेणेकरून वाहनधारक आपल्या वाहनाचा वेग कमी करून पुढचा प्रवास करतो. मात्र एरंडोलचा किस्सा वेगळाच आहे. एरंडोल-म्हसावद शहरी हद्द अपवाद म्हणावा लागेल….
रस्त्यांमध्ये खड्डे की खड्यांमध्ये रस्ता हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. एरंडोल-म्हसावद रस्ता मोठ्या वाहतुकीचा, कॉलेज रस्ता, नवीन वसाहती, शाळा कॉलेज रोड चांगला रस्ता झाला काँक्रीटचा त्यामुळे वाहने सुसाट डबल-ट्रीपल सीट त्यामुळे अपघातांची संख्याही वाढली. त्यातच पंचायत समिती, तहसिल कार्यालय, कोर्ट, पोलिस स्टेशन नेहमीच गर्दीचा परिसर. पुढे दवाखाना, नाका, कॉलनी परिसर त्यामुळे वर्दळ तर होणारच. मग काय, गतिरोधक बसविण्याची मागणी वाढली. संबंधितांनी दखल तर घेतली परंतू मागणी करणार्‍यांचीच चांगलीच जिरविली की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे. मंडळी, त्याचं झालं असं की, एरंडोल तहसिल ते बालाजी ऑईल मील हे अंतर जेमतेम एक कि.मी. मात्र या अंतरावर तब्बल एक-दोन नव्हे तर तब्बल सात ठिकाणी गतिरोधक टाकून ठेवले आहेत. वापरून, चालून कमी होतील या म्हणीनुसार चक्क सहा महिने झाल्यानंतर जैसे थे, त्यामुळे मोटार सायकल-दे दणादण, त्यात डबलसीट, ट्रीपल सीट असेल, पती-पत्नी असतील, बाळ असेल तर…त्याहीपेक्षा ट्रक-ट्रॅक्टर असेल तर दे दणादण, मोठ्ठा आवाजामुळे सर्वांनाच भिती. सरस्वती कॉलनीजवळ तर कापसाचा ट्रक फेल झाला, सुदैवाने अप्रिय घटना घडली नाही मात्र गतिरोधक (अवजड) मुळे परिसरातील नागरीकांची झोप उडाली, भितीने पोटात गोळा उठतो त्याचं सोयरंसुतक आहे कोणाला ?….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!