हॉटेल इंद्रभुवनचा भव्य शुभारंभ आज. -संत श्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शहरातील प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक हॉटेल इंद्रभुवन आता नव्या रूपात, नव्या सजावटीसह पुन्हा आपल्या सेवेत सज्ज होत आहे. १९२० पासून आपल्या स्वादिष्ट जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल इंद्रभुवनचा भव्य शुभारंभ शुक्रवार, ९ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याचे शुभ हस्ते उद्घाटन परमपुज्य संतश्री प्रसाद महाराज (संत सखाराम महाराज संस्थान, अमळनेर) व परमपुज्य आनंदजिवन स्वामी आणि परमपुज्य योगीस्नेह स्वामी (स्वामीनारायण मंदिर, धुळे) यांच्या शुभाशीर्वादाने होणार आहे.
हॉटेल इंद्रभुवन, दगडी दारवाज्या समोर, अमळनेर येथे नव्या रंगसंगतीत व आकर्षक वातावरणात ग्राहकांना अधिक चविष्ट आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे. जोशी कुटुंबियांनी आपल्या ग्राहकांचा पूर्वीप्रमाणेच प्रेमळ सहवास लाभावा, ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मनीष जगदीश जोशी, सौ. सोनल मनीष जोशी, दर्श मनीष जोशी व समस्त जोशी परिवार यांनी केले आहे.

“अमळनेरच्या ‘हॉटेल इंद्रभुवन’चा 105 वर्षांचा दैदीप्यमान प्रवास – आता नव्या रूपात, नव्या चविंसह!”
अमळनेर शहरात 1910 पासून आपल्या दर्जेदार व स्वादिष्ट पदार्थांनी ग्राहकांची मने जिंकणारे हॉटेल इंद्रभुवन आता नव्या रूपात उभे राहत आहे. भावनगर (गुजरात) येथून आलेले स्व. उमाशंकर जोशी यांनी दालव्यवसायातून सुरुवात करत हॉटेल व्यवसायाची पायाभरणी केली आणि “दालवाले महाराज” म्हणून प्रसिद्धी मिळवली.
या व्यवसायाची परंपरा स्व. वेणीशंकर जोशी, स्व. हसमुख जोशी, स्व. जगदीश जोशी, स्व. कन्हैयालाल जोशी यांनी समर्थपणे पुढे नेत हॉटेलला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. स्वातंत्र्यलढा, कुस्ती, संगीत, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान अद्वितीय आहे.
आज जवळपास 105 वर्षांनंतर, इंद्रभुवन आता नव्या आणि भव्य इमारतीत सुरु होत असून, जुन्याच चवीनं नव्या दमदार सेवा देण्यासाठी सज्ज आहे. पारंपरिक भजी, पोहे, मिसळ, पाववडा यासोबतच आता दिल्ली स्पेशल चाट (दहिवडा, पाणीपुरी, राज कचोरी), मुंबई स्पेशल पावभाजी, आणि नेपाळी चायनीजचे स्वादही ग्राहकांना मिळणार आहेत. तसेच मावा मिठाई, ड्रायफ्रूट मिठाई, बंगाली मिठाई आणि ताजे पनीरसुद्धा इथे उपलब्ध आहे.
हॉटेल इंद्रभुवन – स्वाद, परंपरा आणि नवनवीनतेचा संगम, आता नव्या रुपात तुमच्या सेवेत!