संत सखाराम महाराज पालखी मिरवणूक उत्साहात पार. – भाविकांच्या गर्दीत भक्तिरसाची उधळण..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-
22 Ct सोने 91.60% : ₹. 90050/-
18 Ct सोने 75.00% : ₹. 74400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 990/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
वैशाख शुद्ध पौर्णिमा, दिनांक १२ रोजी, संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील पालखी मिरवणूक भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडली. “संत सखाराम महाराज की जय”च्या जयघोषात हजारो भाविकांनी पालखी व हभप प्रसाद महाराजांचे दर्शन घेतले.

सकाळी सहा वाजता विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात लालजींची पूजा होऊन मूर्ती पालखीत विराजमान करण्यात आली. मिरवणूक वाडी चौक, राजहोळी चौक, पानखिडकी, सराफ बाजार मार्गे सायंकाळी पावणे सहा वाजता दगडी दरवाज्याजवळ पोहोचली.
पावसामुळे तासभर विश्रांती
यंदा ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा त्रास कमी झाला, मात्र दुपारी पावसाने हजेरी लावल्याने मिरवणुकीला एक तास विश्रांती घ्यावी लागली. पाऊस थांगताच मिरवणूक पुन्हा सुरू झाली. दगडी दरवाज्यानंतर वाहतूक मार्गात बदल करून पालखी महाराणा प्रताप चौक ते सुभाष चौक मार्गे पुढे सरकवण्यात आली.
भाविकांसाठी सेवा उपक्रमांची रेलचेल
मिरवणुकीदरम्यान भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून स्वामी मित्र मंडळ, लायन्स क्लब, ओम साई लहरी भजनी मंडळ, कुसुमाई बिझिनेस ग्रुप, पू. सानेगुरुजी स्कील डेव्हलपमेंट सेंटर, स्व. प्राची भट यांच्या स्मरणार्थ डॉ. अभिषेक भट, रोटरी क्लब, राजे संभाजी मित्र मंडळ आदी संस्थांनी ताक, मठ्ठा, सरबत, थंडपेय, फराळ व अल्पोपहार वाटप केले. विविध संस्थांनी पाण्याचे जार ठिकठिकाणी ठेवले होते.
पोलीस यंत्रणेची चोख व्यवस्था
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महिला होमगार्ड्स, पोलीस कर्मचारी व साध्या वेशातील पोलीस यांची नियुक्ती करून महिलांच्या सुरक्षेची व शिस्तबद्ध दर्शनाची दक्षता घेण्यात आली.