युद्धविरामानंतर गुंतवणूकदारांची चांदि. -सेन्सेक्स २,९७५ अंकांनी झेपावला गुंतवणूकदार १६.१५ लाख कोटींनी मालामाल..

24 प्राईम न्यूज 13 May 2025

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम तसेच अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार तणाव कमी करण्यासाठी वाढीव आयात शुल्काला ९० दिवसांची स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भारतीय शेअर बाजारात विक्रमी तेजी पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स तब्बल २,९७५.४३ अंकांनी म्हणजेच ३.७४ टक्क्यांनी वाढून ८२,४२९.९० या सात महिन्यांच्या उच्चांकावर बंद झाला.

या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकूण १६.१५ लाख कोटी रुपयांची भर पडली. निफ्टी निर्देशांकातही भरीव वाढ नोंदवण्यात आली. सकाळपासूनच बाजार सकारात्मक वातावरणात उघडला होता आणि दिवसभरात शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली.