अमळनेर-पुणे बसचा आर.के. नगरजवळ अपघात.

आबिद शेख/अमळनेर

.
आज सकाळच्या सुमारास अमळनेर-धुळे मार्गावर आर. के. नगरजवळ बसचा अपघात झाला. घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्पीड ब्रेकरवर डंपरने अचानक ब्रेक दाबल्याने मागून भरधाव येणारी बस थेट डंपरच्या मागे घुसली.
या अपघातात बसचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असून त्याचे पाय गाडीत अडकले होते. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.