अमळनेर अर्बन बँकेच्या शतकोत्सव वर्षानिमित्त ४ जुलै रोजी मोफत समग्र आरोग्य तपासणी शिबिर..

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर : आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि दि. अमळनेर को-ऑप. अर्बन बँकेच्या शतकोत्सव वर्षानिमित्त, दि. अमळनेर अर्बन बँक, जिल्हा उपनिबंधक अमळनेर, सहाय्यक निबंधक कार्यालय सहकार खाते आणि लायन्स क्लब, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत समग्र आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ४ जुलै शुक्रवार रोजी स्टेशन रोडवरील पू. सानेगुरुजी पुतळ्यासमोर दि. अमळनेर को-ऑप. अर्बन बँक कार्यालयात सकाळी ११ वाजता होणार आहे.

या आरोग्य शिबिरात जनरल डायग्नोस्टिक लॅबोरेटरी, मुंबई यांच्या तज्ज्ञ पथकाकडून खालील महत्त्वाच्या चाचण्या पूर्णतः मोफत करण्यात येणार आहेत:

थायरॉईड प्रोफाइल – ३ चाचण्या

किडनी प्रोफाइल – ७ चाचण्या

HbA1c (डायबेटीस) – २ चाचण्या

लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT) – ११ चाचण्या

रक्त हिमोग्राम (CBC) – २८ चाचण्या

लिपिड प्रोफाईल – ८ चाचण्या

लोह तपासणी (Iron Studies) – ३ चाचण्या

या सर्व तपासण्या अंदाजे ₹३५०० किंमतीच्या असून त्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी अमळनेर अर्बन बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, कर्मचारी, पिग्मी एजंट तसेच लायन्स क्लबचे सभासद यांना आवाहन करण्यात आले आहे.

अमळनेर अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, व्हा. चेअरमन रणजित शिंदे, संचालक मंडळ, तसेच लायन्स क्लबचे प्रेसिडेंट डॉ. संदीप जोशी, सेक्रेटरी महेंद्र पाटील, ट्रेझरर नितीन विंचूरकर, सभासद आणि बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांनी नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!