हिंगोणे खु. प्र.अ. गावाजवळ दोन अनधिकृत रेती वाहतूक करणारे टेम्पो पकडले..


आबिद शेख/अमळनेर
मौजे हिंगोणे खुर्द प्र.अ. गावाजवळ आज उपविभागीय अधिकारी मा. नितीनकुमार मुंडावरे साहेब व तहसीलदार मा. रूपेशकुमार सुराणा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज रेती वाहतुकीवर कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान दोन अनधिकृत रेती वाहतूक करणारे टेम्पो आढळून आले असून, दोन्ही टेम्पो ताब्यात घेऊन संबंधित मुद्देमाल तहसील कार्यालय, अमळनेर येथे जमा करण्यात आले आहेत.
या कारवाईसाठी मंडळ अधिकारी श्री. गौरव शिरसाठ, मंडळ अधिकारी श्री. वाय. आर. पाटील, तसेच ग्राम महसूल अधिकारी श्री. अमोल पाटील यांचे पथक कार्यरत होते.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार अवैध वाळू वाहतुकीस आळा बसवण्यासाठी महसूल प्रशासन सतर्क असून, अशा कारवायांमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.