खा. शि. मंडळाच्या मतदार यादीवरून वादंग; प्रसाद शर्मांची लेखी मागणी..


अमळनेर खा. शि. मंडळ अमळनेरच्या फेलो, पेट्रन व व्हा. पेट्रन सभासदांची मतदार यादी फोटोसह अद्ययावत करण्यासाठी जाहीर केलेल्या निविदेवरून वाद निर्माण झाला आहे.
श्री राजकुमारजी छाजेड यांनी सदर निविदा भरल्यानंतर दिनांक ३० जून २०२५ रोजी मा. अध्यक्षांना दिलेल्या पत्रात असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सभासद प्रसाद रमेशचंद शर्मा यांनी अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि चिटणीस यांच्याकडे यासंबंधी लेखी खुलासा करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, राजकुमारजी छाजेड यांच्या पत्रात सभासद व संस्थेच्या हिताविरोधात वक्तव्ये करण्यात आली असून, त्या पत्रातील आरोपांवर खुलासा करण्यात यावा. तसेच मतदार यादी फोटोसह तातडीने प्रसिध्द करून निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ दरम्यान घेण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.
प्रसाद शर्मा यांनी संस्थेच्या पारदर्शकतेसाठी फोटोचे काम पूर्ण करून लवकरात लवकर निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशी विनंती केली आहे.