वरणगाव पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत..

0


24 प्राईम न्युज 3 Jul 2025

स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने आज वरणगाव पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस गावठी कट्टा (पिस्टल) व पाच जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. आरोपी मागील सहा महिन्यांपासून फरार होता.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. त्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली की वरणगाव पोलीस ठाणे हद्दीतील फुलगाव फाट्याजवळ एक इसम गावठी कट्टा घेऊन फिरत आहे.

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक मिरी सोपान गोरे, पो.त.नि. रवि नरवाडे, पोहे. गोपाळ गव्हाळे आणि पो.अं. रविंद्र चौधरी यांनी संयुक्त कारवाई केली. फुलगाव फाट्याजवळील पुलाजवळ सापळा रचून आरोपी केशव उर्फ सोनु सुनिल भालेराव (वय २२, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) याला अटक करण्यात आली.

त्याच्याकडून २७,५००/- रुपयांचा गावठी कट्टा व पाच पितळी धातूचे जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४८/२०२५, भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकशीदरम्यान उघड झाले की, आरोपी यापूर्वी वरणगाव पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक २०/२०२५, कलम ३/२५, ३(५) अन्वये दाखल प्रकरणात देखील फरार होता. त्यामुळे त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्व पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, जळगावच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!