दहावीचा निकाल आज – विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता ऑनलाइन पाहता येणार.

24 प्राईम न्यूज 13 May 2025

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 980/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
दहावीच्या निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल आज, १३ मे रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता ऑनलाइन स्वरूपात आपला निकाल पाहता येणार आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी यापूर्वीच कळवले होते की, दहावीचा निकाल १५ मेपूर्वी जाहीर होईल. त्यानुसार आज निकालाची घोषणा करण्यात आली आहे.
यंदा दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान पार पडल्या होत्या. या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल १६.११ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८.६ लाख मुले, ७.४७ लाख मुली आणि १९ तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून निकाल पाहता येईल.