धर्म नाही माणुसकी मोठी! – उषा ताई मोरे यांच्या उपचारासाठी मुस्लिम बंधू फारुख शेख यांचा मदतीची हातभार..

24 प्राईम न्यूज 13 मे 2025

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-
22 Ct सोने 91.60% : ₹. 90050/-
18 Ct सोने 75.00% : ₹. 74400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 990/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
जळगाव – अलिकडेच एक हृदयस्पर्शी घटना जळगावात घडली, जिथे धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन मानवतेचे उदाहरण साऱ्यांसमोर आले. रामेश्वर कॉलनीतील रेणुका नगर येथे राहणाऱ्या हिंदू भगिनी उषा ताई मोरे यांच्या घरात दुर्दैवाने आग लागून त्या भाजून गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज भासू लागल्यावर स्थानिक व्हॉट्सअप ग्रुप “एस.एम.” मार्फत मदतीचे आवाहन करण्यात आले. हे आवाहन पाहून जळगाव मुस्लिम मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी आपल्या साथीदारांसह तत्काळ रुग्णालयात धाव घेतली.
फारुख शेख यांनी उषा ताईंच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांच्या मुलीला, सौ. आरतीला, धीर देत पाच हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या हातात सुपूर्द केला. यावेळी रुग्णालयाचे संचालक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनाझ पटेल, इकबाल शेख सर यांच्यासह इतरही समाजसेवक उपस्थित होते.
फारुख शेख यांनी डॉ. मीनाझ पटेल यांचे सुद्धा आभार मानले, ज्यांनी जखमी रुग्णावर तत्काळ उपचार सुरू करून वैद्यकीय जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले.