अमळनेरमध्ये डॉ. राजेंद्र पिंगळे यांचा शिवसेनेत प्रवेश. — नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वागत..

आबिद शेख/अमळनेर
शिवसेनेला अमळनेर तालुक्यात नवा बळकटी देणारी घडामोड घडली आहे. उबाठाचे माजी उपजिल्हाप्रमुख व माजी उपनगराध्यक्ष डॉ. राजेंद्र पिंगळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी येथे भगवा फटका देऊन त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-
22 Ct सोने 91.60% : ₹. 90050/-
18 Ct सोने 75.00% : ₹. 74400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 990/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
या प्रसंगी नूतन तालुका प्रमुख सुरेश पाटील व शहर प्रमुख संजय पाटील यांनी त्यांचे स्वागत करत पुढील काळात शिवसेना संघटन वाढीसाठी शुभेच्छा दिल्या. आमदार दादासाहेब अमोल चिमणराव पाटील यांनीही आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या.

डॉ. पिंगळे हे मितभाषी व जनसंपर्कात प्रभावी असून त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला तालुक्यात बळ मिळणार आहे, असे सुरेश पाटील यांनी सांगितले. आगामी काळात आणखी काही मान्यवर नेते शिवसेनेत दाखल होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक विक्रांत पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, उद्योगसेनेचे अमित ललवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.