बालाजी विद्यालय गांधली पिळोदे येथील माजी विद्यार्थी 21 वर्षांनंतर एकत्र. -स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा, शाळेस दिली शिवाजी महाराजांची मूर्ती भेट..


अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-
22 Ct सोने 91.60% : ₹. 90050/-
18 Ct सोने 75.00% : ₹. 74400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 990/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
24 प्राईम न्यूज 13 May 2025
ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी संचलित बालाजी विद्यालय गांधली पिळोदे येथील 2003-04 बॅचमधील दहावीचे विद्यार्थी तब्बल 21 वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या भावनिक सोहळ्यात सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शालेय आठवणींना उजाळा दिला आणि जुन्या सवंगड्यांशी संवाद साधला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. यानंतर उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवर यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेस छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेटवस्तू म्हणून देण्यात आली. शाळेच्या शिक्षिका वी.एस. चित्ते, एस.वाय. सूर्यवंशी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
या स्नेहमेळाव्यात माजी मुख्याध्यापक एच.बी. जाधव, एस.पी. मोरे, एस.बी. सोनवणे, एच.बी. शिंदे, एस.डी. सूर्यवंशी, एस.जे. शेंकपाळ, पी.एफ. देवरे यांनी आपले अनुभव कथन करत जुन्या आठवणी सांगितल्या व नव्या वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, या वेळी उपस्थित सर्वांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तिलोत्तमा साळुंखे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नम्रता माधुरी बडगुजर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी अनेक विद्यार्थी भावनिक झाले होते.
या प्रसंगी माजी विद्यार्थी मनीषा सोनवणे, संभाजी महाजन, रोशन देशमुख, अनिल महाजन, नितीन शिंदे, रमाकांत खैरनार, गोपाल सनेर, योगेश महाजन, विलास महाजन, विजय बिराडे, योगेश पाटील, पराग बडगुजर, प्रदीप शिंदे, सुनील बोरसे, परशुराम शिंदे, विजय पारधी, प्रतिभा पाटील, मोनाली पारधी, योगिता पाटील, अपर्णा अंबुरे व इतरांनी आपापल्या भावना व्यक्त करत शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.