“कर्नल सोफियांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; मंत्री विजय शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश.”

24 प्राईम न्यूज 15 May 2025

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 980/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
भोपाळ – कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे मंत्री कुवर विजय शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मध्य प्रदेश हायकोर्टाने दिले आहेत.

हायकोर्टाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली असून, न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राज्याचे पोलीस महासंचालक यांना बुधवारी सायंकाळपर्यंत मंत्री शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
कोर्टाने स्पष्ट केले की, जर अशा प्रकारचे विधान पुन्हा करण्यात आले, तर मंत्री शहा यांना न्यायालयाच्या अवमानाची कारवाई देखील भोगावी लागू शकते.
सरकारी महाधिवक्त्यांनी वेळ मागितल्यानंतर, न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता प्रशांत सिंह यांना निर्देश जारी केले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.
दरम्यान, मंत्री शहा यांच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, न्यायालयाचा आदेश केवळ वर्तमानपत्रातील बातम्यांवर आधारित आहे. यावर न्यायालयाने उत्तर दिले की, याप्रकरणी व्हिडिओ लिंकसारखा अधिकृत पुरावाही विचारात घेतला जाईल.