ढेकू रोडवरील अर्धवट कॉंक्रिटीकरण कामामुळे नागरिक त्रस्त; -सभापती श्याम पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली तात्काळ काम पूर्ण करण्याची मागणी.

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर येथील ढेकू रोड (प्र. जि. मा. ५१) व पिंपळे रोड परिसरातील नागरिकांना अर्धवट रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य समितीचे मा. सभापती श्याम जयवंतराव पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देत तात्काळ कॉंक्रिटीकरण काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 94400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 86850/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 71750/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 975/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

श्री. पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिला यांना पाठीच्या आणि मनक्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच वाहनांचे नुकसान आणि दुरुस्तीचा भार सामान्य नागरिकांवर पडत आहे.
रस्त्याच्या अर्धवट अवस्थेमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, हे काम तात्काळ पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे सभापतींनी म्हटले आहे.