गांजाच्या झुरक्यांमुळे तिघांची गजाआड रवानगी..

आबिद शेख/ अमळनेर

शहरातील पाचकंदील परिसरात गांजाचे झुरके मारणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना १५ मे रोजी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह गांधलीपुरा परिसरात छापा टाकला.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलिसांनी पाचकंदील चौकात कारवाई केली. एका भिंतीच्या आड गांजा सेवन करताना शंकर सुपडू ढालवाले (३२, रा. नगरपालिका दवाखाना मागे), जयसिंग बारकू पारधी (६०, रा. ताडेपुरा) आणि हितेश सुरेश पाटील (२७, रा. जवखेडा, हल्ली मुक्काम तांबेपुरा) हे तिघे आढळून आले.
पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, जितेंद्र निकुंभे आणि अमोल पाटील सहभागी होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 980/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **