संसद रत्न पुरस्कार 2025 : जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव.

आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 980/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
भारतीय संसदेतील उत्कृष्ट कार्यक्षमतेचा सन्मान करणाऱ्या ‘संसद रत्न पुरस्कार 2025’ची नुकतीच घोषणा करण्यात आली असून यावर्षी महाराष्ट्रातील सात खासदारांचा या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे या यादीत उत्तर महाराष्ट्रातून एकमेव प्रतिनिधी म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. श्रीमती स्मिताताई वाघ यांची निवड झाली आहे. हा संपूर्ण जिल्हा आणि विभागासाठी गौरवाचा क्षण मानला जात आहे.

‘संसद रत्न पुरस्कार’ हा भारतीय लोकशाहीतील सर्वोच्च संसदीय कार्यगौरव मानला जातो. प्रश्न विचारणे, चर्चेत सक्रिय सहभाग, खासगी विधेयके मांडणे, तसेच लोकहिताच्या मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवणे अशा विविध निकषांवर आधारित मूल्यांकन प्रक्रियेनंतर हा पुरस्कार दिला जातो.
या पुरस्काराची संकल्पना ‘गांधी विचार मंच’ व माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एस. कृष्णमूर्ती यांच्या पुढाकाराने 2010 साली साकारण्यात आली होती. ‘प्राइम पॉइंट फाउंडेशन’ या संस्थेच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार पहिल्यांदा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.
मा. स्मिताताई वाघ यांनी 17 व्या लोकसभेपासून संसद अधिवेशनात सातत्याने ठसठशीत सहभाग नोंदवला आहे. रेल्वे अंडरपास संदर्भात देशभरातील समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधून त्यांनी नागरिकांच्या वाहतुकीशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडले. यासोबतच, शेतकरी, महिला, आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, बेरोजगारी आदी विषयांवरही त्यांनी स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडली आहे.
त्यांच्या या कार्यक्षमतेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होणे ही केवळ त्यांचीच नव्हे, तर जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाची जिंकलेली शाबासकी आहे. या गौरवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संस्था, कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.