अमळनेरमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस – वीज कोसळून मीटर जळाले, वीज पुरवठा खंडित

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 980/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
अमळनेर : तालुक्यात १८ रोजी रात्री ८ वाजेपासून वादळासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांत पाणी साचले आहे.

धुळे रस्त्यावरील साईप्रसाद हॉटेलजवळ दोन ठिकाणी वीज कोसळल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अचानक वीज कोसळल्याने हॉटेलचा मीटर, जवळची डीपी तसेच समोरील अनुसया मंगल कार्यालय व वॉशिंग सेंटरचे मीटर जळाले आहेत.
या पावसामुळे संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.