छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री. -आज घेणार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ, अन्न व नागरी पुरवठा खाते मिळणार.

24 प्राईम न्यूज 20 May 2025

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. छगन भुजबळ आज मंगळवारी, २० मे रोजी सकाळी १० वाजता राजभवनात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील. महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने मागील काही महिन्यांपासून छगन भुजबळ नाराज होते. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याशीही त्यांचे खटके उडाले होते. परंतु, आता त्यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एण्ट्री होणार आहे.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी झालेल्या विविध आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना ४ मार्च रोजी राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यातील एक मंत्रिपद रिक्त होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खाते हे गेल्या जवळपास अडीच महिन्यांपासून रिक्त आहे. याच मंत्रिपदावर आता छगन भुजबळ यांची वर्णी लावण्यात येणार असल्याचे समजते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87950/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72600/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 985/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **