ब्रेकिंग न्यूज: पाकिस्तानी गुप्तहेर नेटवर्कचा भांडाफोड. – ३ राज्यांतून १२ जण अटकेत


24 प्राईम न्यूज 20 May 2025
भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत सुरक्षेसाठी मोठा धक्का देणारी घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला असून, तपास यंत्रणांनी हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातून मागील ११ दिवसांत १२ जणांना अटक केली आहे.

गुरदासपूर (पंजाब) येथून सोमवारी २ जणांना अटक करण्यात आली. यापूर्वी ७ मे रोजी प्रसिद्ध युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रासह ६ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या सर्वांवर भारतीय सैन्यविषयी गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा गंभीर आरोप आहे.
एनआयएचे पथक ज्योतीची चौकशी करण्यासाठी हरियाणातील हिसार येथे पोहोचले आणि तिला चंदीगडला नेण्यात आले.
मोहम्मद तारीफची कबुली – सिरसा हवाई दलाचे फोटो पाकिस्तानला.
नूह येथून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद तारीफने पाकिस्तानात ३ वेळा प्रवास केला होता. त्याने सिरसा येथील हवाई तळाचे फोटो आणि व्हिडीओ पाक गुप्तचर यंत्रणेला पाठवल्याची कबुली दिली आहे. पाकिस्तानकडून त्या तळावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला होता. तो पाक उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कातही होता.
ज्योतीने घेतले हाफीज सईदच्या अड्ड्यावर हेरगिरीचे प्रशिक्षण
तपासादरम्यान ज्योती मल्होत्राने मुरिदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयात १४ दिवस हेरगिरीचे प्रशिक्षण घेतल्याचे मान्य केले आहे. तिने पाकिस्तानच्या दौऱ्यात मुरिदके, कराची, इस्लामाबाद आणि पाकव्याप्त काश्मीरला भेट दिली होती. तिथे तिच्या सुरक्षेसाठी पाक पोलिसांचा बंदोबस्तही होता.