दुःखद निधन : मसीउल्ला खान ऊर्फ खतीब उस्ताद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर शहरातील अंदरपुरा मोहल्ला येथील रहिवासी मसीउल्ला खान ऊर्फ खतीब उस्ताद यांचे दिनांक २० मे रोजी राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
मूलतः नंदुरबार येथील रहिवासी असलेले खतीब उस्ताद मागील ३५ ते ४० वर्षांपासून अमळनेर येथे स्थायिक होते. ते उच्चशिक्षित होते व सामाजिक कार्यात त्यांना विशेष रुची होती. बारा भाई उर्फ अंदरपुरा मोहल्ला ट्रस्टचे ते सदस्य होते.
ते ए. टी. एन. मोबाईल शाॅपचे संचालक अहेतेश्याम खान आणि राॅयल ऊर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अलमास मॅडम यांचे वडील होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.