एरंडोल येथील यामिनी आरखे राज्य शालेय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची मानकरी..!

एरंडोल (प्रतिनिधि) येथील गुरू हनुमान कुस्तीगीर संस्थेची कुस्तीगीर तथा रा.ती.काबरे विद्यालयाची विद्यार्थीनी यामिनी भानुदास आरखे हिने खोपोली(जि.रायगड) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.
तीला तीचे वडील कुस्ती कोच भानुदास आरखे,वस्ताद अनिल मराठे पहेलवान,योगेश्वरी मराठे,दिलिप वस्ताद यांचे मार्गदर्शन केले.
रा.ती.काबरे विद्यालयातर्फे यामिनी आरखे हिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापिका रोहीणी मानुधने,जाजू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी,नरेश डागा यांनी स्वागत केले.
त्यानंतर यामिनी हिची शहरातुन घोड्यावरून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
ठिकठिकाणी तीचे महीलांनी औक्षण केले तर कुस्तीप्रेमी नागरीकांनी तीचे कौतुक केले.