पाडळसरे धरण प्रकल्पाला ₹८५९ कोटींची PIB मान्यता – जलसिंचनाच्या विकासासाठी ऐतिहासिक टप्पा!

आबिद शेख/अमळनेर

जळगांव आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड (PIB), नवी दिल्ली यांच्या बैठकीत “निम्न तापी (पाडळसरे) सिंचन प्रकल्पास” ₹८५९ कोटींची केंद्र पुरस्कृत आर्थिक मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचा समावेश ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ (PMKSY) अंतर्गत करण्यात आला असून, केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने या प्रकल्पाला गती मिळाली आहे.

🔹 प्रकल्पाचे महत्त्व:
शाश्वत सिंचनाची सुविधा: पावसावर अवलंबून शेतीस आता जलसिंचनाचा आधार मिळणार.
हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली: चोपडा, धरणगाव, अमळनेर, यावल, पारोळा या तालुक्यांना थेट फायदा.
दुष्काळसदृश परिस्थितीतून मुक्तता: पाण्याची उपलब्धता वाढल्याने जलसंकट कमी होणार.
शेतकऱ्यांचे उत्पन्न व दर्जा वाढणार: स्थैर्य आणि उत्पादनात सुधारणा अपेक्षित.
जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाला चालना: भूजल पातळी वाढण्यास मदत.
श्रीमती स्मिताताई वाघ (खासदार, जळगाव लोकसभा) यांचे म्हणणे:
“हा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे. या ऐतिहासिक निधी मंजुरीमुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास शक्य होणार आहे. या निर्णयामुळे फक्त पाणी नव्हे, तर भविष्यातील समृद्धीचाही प्रवाह सुरु झाला आहे.”
मान्यवरांचे विशेष आभार:

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सी. आर. पाटील, गजेंद्रसिंह शेखावत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.
“पाणी, शेती आणि शाश्वत विकास” यांचे त्रिसूत्री साकार करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल म्हणजे जलक्रांतीची नांदी आहे! 🌱