लायन्स क्लब अमळनेरचा ५७ वा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न – अवयवदान शपथ, वारकरी वेशभूषा ठरली आकर्षण..

0

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर— लायन्स क्लब अमळनेरचा ५७ वा स्थापना समारंभ दिनांक ६ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता हॉटेल मिडटाउन, सुभाष चौक येथे अत्यंत उत्साही वातावरणात आणि भव्यतेत पार पडला.

या समारंभात ला.डॉ. संदीप जोशी यांची अध्यक्षपदी, ला.महेंद्र पाटील यांची सचिवपदी, तर ला.नितीन विनचुरकर यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. समारंभास माजी जिल्हापाल (२२३४-H2) लायन गिरीशजी सिसोदिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मुख्य वक्ता म्हणून मुंबईचे सुप्रसिद्ध लेखक, अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते मा. अशोकजी सामेल यांनी प्रेरणादायी भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रादेशिक अध्यक्ष ला.चेतनजी बर्डीया आणि झोन अध्यक्ष MJF ला. विनोदजी अग्रवाल हेही मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.

समाजकल्याणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लायन्स क्लब अमळनेरने जवखेडा येथील सानेगुरुजी शाळेत ७ शिकणारा विद्यार्थी पीयूष विजय ठाकूर याला एका वर्षा शिक्षणासाठी दत्तक घेतले. त्याचा संपूर्ण शैक्षणिक खर्च क्लबकडून उचलण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचा एक विशेष भाग म्हणजे सर्व सदस्यांनी एकत्र येऊन अवयवदानाची शपथ घेतली. यासोबतच, अवयव आणि नेत्रदान जनजागृतीसाठी वर्षभर विशेष उपक्रम राबविण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

समारंभाचे आकर्षण म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व सदस्यांची पारंपरिक वारकरी वेशभूषा, ज्यामुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक व सांस्कृतिक रंग प्राप्त झाला. कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट भोजनासह सेवा, सौहार्द आणि सामाजिक बांधिलकीची नवी प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.लायन्स क्लब चे सर्व पदाधीकारी व सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन डॉ. डिगंबर महाले आणि नयना नवसारीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन लायन नितीन विनचुरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!