“टवाळखोरांचे शैक्षणिक परिसरात थैमान – पोलिसांनी घेतली अद्दल घडवणारी कारवाई!”

आबिद शेख/ अमळनेर

शाळा आणि महाविद्यालये नियमित सुरू झाल्यानंतर त्यांच्या परिसरात विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर अमळनेर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

अमळनेर पोलीस स्टेशनकडून नियुक्त वेगवेगळ्या पथकांनी शाळा, महाविद्यालय परिसरासह मुख्य गर्दीच्या ठिकाणी नियमित गस्त सुरू केली आहे. आज अशाच गस्तीदरम्यान पोलिसांनी शाळा-महाविद्यालय परिसरात कोणताही शैक्षणिक उद्देश नसताना फिरत असलेले सात तरुणांना ताब्यात घेतले.
या सातही तरुणांना कायदेशीर समज देण्यात आली असून, त्यांच्या पालकांनाही सूचित करण्यात आले आहे. भविष्यात कोणीही शाळा-महाविद्यालय परिसरात शैक्षणिक कारणाशिवाय आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक मा. दत्तात्रय निकम यांनी दिला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक, जळगाव; मा. अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार अमोल पाटील, प्रशांत पाटील, गणेश पाटील, नितीन कापडणे आणि जितेंद्र निकुंभे यांनी ही कारवाई केली.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1110/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट