गुरुपौर्णिमेनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो गरजूंनी घेतला लाभ..

आबिद शेख/अमळनेर

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरुदेव दत्त संस्थान आणि ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला शेकडो रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. धार्मिकतेसोबतच सामाजिक क्षेत्रातही नेहमीच पुढाकार घेणाऱ्या संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिनांक 10 रोजी पिंपळे खुर्द येथील दत्त मंदिर परिसरात पार पडलेल्या या शिबिरात नवजात शिशु व बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र ठाकरे आणि डेंटल सर्जन डॉ. श्वेता ठाकरे यांनी रुग्णांची मोफत तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले. वेलनेस फॉरेव्हर मेडिकल यांच्या माध्यमातून रुग्णांना मोफत औषधे व गोड्या पुरवण्यात आल्या.
या उपक्रमाचा पिंपळे, चिमनपुरी, पिंपळे खुर्द, पिंपळे बुद्रुक तसेच परिसरातील अनेक गावांतील गरजू नागरिकांनी लाभ घेतला.
श्री गुरुदेव दत्त संस्थानचे अध्यक्ष निंबा ज्याला चौधरी आणि प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, पुरुषोत्तम लोटन चौधरी, गोकुळ पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.