वाळू तस्करीला चाप! महाराष्ट्र शासनाचा कठोर निर्णय — थेट गुन्हे दाखल, तुरुंगवास अटळ..

24 प्राईम न्यूज 12 Jul 2025

राज्यात बेकायदेशीर वाळू आणि गौण खनिज उत्खननामुळे महसुलाचे मोठे नुकसान व पर्यावरणाची अपरिमित हानी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाच्या नव्या आदेशानुसार केवळ दंड न आकारता, आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येणार आहे.

वाळू तस्करांवर महसूल व पोलीस अधिकारी थेट FIR दाखल करतील भारतीय न्याय संहिता (BNS), पर्यावरण संरक्षण कायदा, खनिज कायदा यांसारख्या विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होणार ‘लोकविघातक व्यक्ती’ घोषणेची तरतूद
जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त वाळू तस्करांना “लोकविघातक व्यक्ती” म्हणून घोषित करू शकतात अशा व्यक्तींच्या हालचालींवर बंदी घालण्याचा अधिकार मिळणार अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवणार:
कारवाई न करणाऱ्या महसूल किंवा पोलीस कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. महसूल, पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणांनी एकत्रितरित्या समन्वय साधून कारवाई करावी.
हा आदेश म्हणजे वाळू तस्कर व खनिज माफियांना सरकारने दिलेला थेट इशारा आहे – कायद्याचे उल्लंघन केल्यास आता तुरुंगवास अटळ आहे!
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1110/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट