तालुक्यात इंग्रजी माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षेत तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या आर्यन पाटीलचे कौतुक

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : सेंट मेरी यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी इंग्लिश मीडियम परीक्षेत आर्यन हितेश पाटील याने तालुका गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक पटकावला आहे. इंग्रजी माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारा तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे.

आर्यन हा साने गुरुजी विद्या मंदिर शाळेत लिपीक म्हणून कार्यरत असलेल्या श्री. हितेश विजय पाटील (बी.ए., बी.एड) यांचा मुलगा असून ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. विशेष म्हणजे आर्यन हा वाघोदे गावाचे माजी सरपंच तसेच अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीयुत डॉ. विजय छबिलाल पाटील यांचा नातू आहे.
आर्यनच्या या यशामुळे वाघोदे गावासह शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र त्याचे कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट