अमळनेरात मंगळग्रह सेवा स्वंस्था तर्फे आज मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर, ना. गुलाबराव पाटील सोशल फाउंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाउंडेशन (धनवाडी) आणि झुंझुंवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने २० जुलै रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर श्री मंगळग्रह मंदिर परिसरात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार असून गरजूंनी तपासणी करून घ्यावी. तपासणीनंतर निवड झालेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठवले जाणार आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांनी आधारकार्ड व रेशनकार्ड यांच्या छायांकित प्रती आणाव्यात. रक्त पातळ करणारी औषधे किंवा मधुमेह (डायबेटीस) गोळ्या सुरू असल्यास त्या गोळ्या आणि डॉक्टरांचे फाइल सोबत आणणे बंधनकारक आहे.
शिबिरातील रुग्णांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, मात्र पूर्वीचे ऑपरेशनसंबंधित रिस्क असेल तर त्याचे दस्तऐवजही सोबत आणावेत, असे आयोजकांनी कळविले आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट