नीट उत्तीर्ण युवक मोबाईल गेमच्या व्यसनासाठी बनला रेल्वे चोर..

24 प्राईम न्यूज 20 jul 2025

मोबाईलवरील ऑनलाइन गेम्सच्या व्यसनामुळे एका नीट परीक्षा उत्तीर्ण तरुणाने गुन्हेगारीकडे वळत रेल्वेत प्रवाशांचे सामान चोरण्याचा मार्ग स्वीकारला. रेल्वे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तपास करताना या आरोपीला अटक केली असून त्याच्यावर अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

अटक केलेल्या युवकाचे नाव तुफैल रजा अख्तर मेमन (२५) असे असून तो मूळचा धुळे जिल्ह्यातील आहे. नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी मुंब्रा (ठाणे) येथे राहायला आला होता. मात्र, मोबाईलवरील ऑनलाइन गेम्सच्या व्यसनामुळे त्याने शिक्षण अर्धवट सोडले आणि पैशांची गरज भागवण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग अवलंबला.
तो लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवाशांच्या बॅगा चोरत असे. विशेष पथकाने लावलेल्या सापळ्यात तो अखेर सापडला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. रेल्वे पोलिस ठाण्यांमध्ये त्याच्यावर अनेक चोरीचे गुन्हे नोंदवलेले आहेत.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट