कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीचे आंदोलन.

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर -महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेविरोधात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात महाविकास आघाडीतर्फे आज अमळनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. विधानभवनात मंत्री रमी खेळण्यात व्यस्त असताना शेतकरी पावसाअभावी व वाढत्या शेतीखर्चामुळे चिंताग्रस्त आहे, असा आरोप या वेळी करण्यात आला. शेतकऱ्यांच्या वेदनेशी नातं नसणाऱ्या कोकाटे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आघाडीने केली.
तसेच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड व छावा संघटनेचे अध्यक्ष यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करून तात्काळ अटक करावी अशी मागणीही करण्यात आली. सत्ताधारी पक्षाचे मंत्री, आमदार व कार्यकर्ते दहशत निर्माण करत असून, राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
राज्यात महिलांना, वृद्धांना व सर्वसामान्य नागरिकांना निर्भयपणे जगता यावे असे वातावरण निर्माण करणे ही गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी असून, ते यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका करण्यात आली.
सदर निवेदन महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75700/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट