अमळनेर PTA क्लासेस संघटनेने30 गरजू विद्यार्थ्यांना घेतले दत्तक.

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर, दिनांक 21 जुलै -अमळनेर तालुक्यातील 30 गरजू,होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांनाअमळनेर क्लासेस संघटनेने (PTA) यावर्षीसुद्धा शैक्षणिक दत्तक घेतले.ही केवळ मदत नाही, तर एक जिव्हाळ्याची जबाबदारी आहे.या विद्यार्थ्यांपैकी बरेचसे पित्याचे छत्र हरवलेले अनाथ आहेत, तर काहींच्या
घरी दोन वेळच्या अन्नाची भ्रांत. परंतु
शिक्षणाचा दिवा विझू नये म्हणून
PTA च्या समर्पित शिक्षकांनी त्यांच्या
आयुष्यात प्रकाश टाकण्याचा वसा
घेतला आहे या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर नि:शुल्क
क्लासेस, पुस्तके, वह्या व शैक्षणिक
साहित्य दिले जाणार आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा मा नितीन मुंडावरे साहेब (उपविभागीय अधिकारी, अमळनेर) यांच्या कार्यालयात PTA अध्यक्ष भैय्यासाहेब मगर सर यांनी केली तसेच प्रतिवर्षी अमळनेर PTA क्लासेस संघटने मार्फत 400 हून अधिक विद्यार्थ्यांना कुटुंबाची आर्थिक
स्थिती पाहता फी मध्ये सवलत दिली जाते.
मा. नितीन मुंडावरे साहेबांनी PTA
संघटनेच्या या समाजोपयोगी कार्याचे
विशेष कौतुक केले आणि भविष्यात
शासनस्तरावरून अशा संघटनांना
प्रोत्साहन मिळावे अशी भावना व्यक्त
केली. कार्यक्रमाला PTA चे खालील
मान्यवर सदस्य उपस्थित होते: भैय्यासाहेब मगर सर (अध्यक्ष), किरण माळी सर, राकेश बडगुजरसर, सुरश्री वैद्य मॅडम, सुधीर टाकणे सर, सोनल जोशी मॅडम, वैशाली निकम मॅडम, शिरीष डहाळे सर,शेखर कुलकर्णी सर, हर्षल बडगुजर
सर, आरिफ पिंजारी सर, ज्ञानेश्वर मराठे सर, स्वर्णदिप राजपूत सर आणि इतर समर्पित शिक्षक.
आज PTA क्लासेस संघटनेमुळे शिक्षण म्हणजे केवळ व्यवसाय नव्हे,तर समाजसेवेची एक पवित्र प्रक्रिया आहे, हे पुन्हा सिद्ध झाले!
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1160/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट