बालिका स्नेही पंचायततर्फे बालविवाहमुक्त व व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रम..

0

आबिद शेख/अमळनेर

ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे महिला व बाल विकास विभागाच्या बालिका स्नेही पंचायत च्या माध्यमातून तसेच कै. सु. आ. पाटील माध्यमिक विद्यालय, पिंपळे बु. येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एच. भोसले सर व प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील यांच्या प्रेरणेने बालविवाहमुक्त, व्यसनमुक्ती आणि तंबाखूमुक्त गाव करण्याची शपथ घेण्यात आली.

गावात काढण्यात आलेल्या प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी – “मुलींचे शिक्षण – प्रगतीचे रक्षण”, “पर्यावरण वाचवा – भविष्य घडवा”, “दारू पळवा – गाव वाचवा”
अशा प्रभावी घोषणांद्वारे ग्रामस्थांचे लक्ष वेधले.

यानंतर समृद्धी ग्रामपंचायत व बालिका स्नेही पंचायत च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाटिकेद्वारे मुलींवरील अन्याय, शिक्षणाचे महत्त्व, बालविवाह प्रतिबंध आणि दारू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम यासारख्या गंभीर विषयांवर जनजागृती करण्यात आली.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये –

पिंपळे खुर्द येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील पुरुषोत्तम लोटन चौधरी, निंबा बापू चौधरी, गोकुळ पाटील, संतोष चौधरी ग्रामसेवक के. के. लंकेश मुख्याध्यापक संजय भोसले ज्येष्ठ शिक्षक डी. बी. पाटील, सी. एन. पाटील
तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, गावातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला. कार्यक्रमानंतर सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना जलेबी वाटप करून त्यांचे कौतुक केले.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 99200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75400/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1160/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!