गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान तर्फे पर्यावरण संवर्धन व श्रम संस्कार छावणी संपन्न..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने दोन दिवसांची “पर्यावरण संवर्धन, संगोपन-आपली भूमिका व जबाबदारी” या विषयावर श्रम संस्कार छावणी आयोजित करण्यात आली. छावणीचे उद्घाटन प्रा. श्याम पवार, प्राचार्य अरविंद सराफ, कवी शरद दादा धनगर, प्रा. सुरेश तात्या तसेच स्वादिष्ट उद्योग समूहाचे निलेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.

“खरा धर्म तो एकची धर्म” या प्रार्थनेने छावणीची सुरुवात झाली. तसेच संविधानातील उद्देशिका मुलांनी वाचली. नंदुरबार, नवापूर, धडगाव, अमरावती, अहील्यानगर, संभाजीनगर, धुळे, कुसुंबा, भुसावळ, जळगाव व अमळनेर अशा विविध भागांतील 65 विद्यार्थी या छावणीत सहभागी झाले.
छावणीत “आपण जेव्हा अधिकार मागतो, तेव्हा त्याला जोडून कर्तव्य येतात… आपण जेव्हा स्वातंत्र्य पाहिजे म्हणतो, तेव्हा जबाबदारीही येते…” या विचारांवर खेळ, गाणी, गोष्टी व गप्पांच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधण्यात आला.
प्रा. दर्शन पवार यांनी साने गुरुजींच्या विचारांचा संदर्भ देत “बलासागर भारत म्हणजे महासत्ता भारत होण्यासाठी देशातील विविधता, एकात्मता व बंधुता जोपासत प्रेमाने एकत्र यावे लागेल” असे सांगितले. मुलांनी डोंगर चढून निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला.
शिंदखेडा येथील वृक्षमित्र योगेश चौधरी यांचा गोपाळ नेवे व सराफ सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. छावणीत पारंपरिक खेळ, गाणी, गोष्टी, नृत्य यांच्या माध्यमातून मुलांना देश व समाजाप्रती जबाबदारी समजावून सांगण्यात आली. तसेच झाडे, पक्षी व जैवविविधतेची ओळख करून देण्यात आली.
छावणी यशस्वी होण्यासाठी गौरव महाले (समन्वयक), समृद्धी देसले, आश्विनी वाघमोडे, शुभम पवार, तुषार पाटील, लोकेश वाणी, रेणुका लोहार, विशाखा राजपूत, शिव निकम, प्रणव पाटील, प्रथमेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी अमळनेर शहरातील डॉ. सचिन पाटील, रणजित शिंदे (कुसुंबा), डॉ. लिना, अतुल चौधरी, साक्षी रोहित सोनार, अमरावती येथील साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित युवा साथी आकाश देशमुख, शाहू कल्याणकर आदी 20 मान्यवर उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1180/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट